अखेर राणेंनी दिला राजीनामा

rane
मुंबई : आज अखेर उद्योगमंत्री पदाचा राजीनामा नारायण राणे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी मनधरणीसाठी नारायण राणेंना बोलावले होते. मात्र नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना निवासस्थानीच आपला राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांना राजीनामा देऊ नका अशी विनंतीही केली असल्याचे सांगण्यात येत होते.

काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर नारायण राणेंची नाराजी घालवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. त्याला कितपत यश मिळते हे ही आज स्पष्ट होईल. आजच्या पत्रकार परिषदेत नाराज नारायण राणे कुणावर हल्लाबोल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसमध्ये आल्यापासून मुख्यमंत्रीपदाची उघड मनिषा बाळगणारे नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राणे यांचा राग पक्षश्रेष्ठींवर नसून त्यांचा राग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत राणे त्यांचा विरोधात तोफ डागणार हे निश्चित आहे. पण त्याच वेळी राणे काँग्रेसमधून बाहेर पडणार का अशीही चर्चा आहे. राणे यांनी पक्ष सोडू नये यासाठी कॉंग्रेच्या वरिष्ठ स्तरावर सुरु असलेल्या प्रयत्नांना यश येते का हे आजच स्पष्ट होणार आहे.

नारायण राणे यांच्यापुढे सध्या दोनच पर्याय असून एकतर काँग्रेसमध्येच राहणे आणि दुसरा म्हणजे भाजपमध्ये जाणे. कारण शिवसेनेची दारे राणेंसाठी बंद आहेत. राणे यांची ताकद पूर्वी सारखी राहिली नाही. अनेक जण त्याना सोडून गेले आहेत, त्यामुळे ते वेगळा पक्षा स्थापन करतील अशी शक्यताही दिसत नाही.

Leave a Comment