राणेंचे आव्हान…केसरकर म्हणतात ,मतपेटीतून उत्तर मिळेल !

kesarkar
मुंबई – कोकणात आता उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असला तरी त्यांच्या विरोधकांनीही दंड थोपटले आहे ;पण दादागिरी करून नव्हे तर मतपेटीतून उत्तर देवू असे प्रत्युत्तर राणेंना दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले आमदार दीपक केसरकर यांनी हे आव्हान दिले आहे. ते म्हणाले ,नारायण राणे यांची भाषा घसरत चालली असून ते गुंडगिरीची भाषा वापरत आहेत, त्यांचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. मात्र आम्ही त्यांना मतपेटीतून उत्तर देऊ, अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली .
रविवारी कणकवली येथे झालेल्या सभेत नारायण राणे यांनी केसरकर आणि शिवसेनेवर तोफ डागली होती. आमच्यावर दगड उचलणाऱ्यांना जशासतसे उत्तर द्या, अशा शब्दात नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यात आवाहन केले होते. तसेच दीपक केसरकर यांच्यावरही टीका केली होती. त्यावर उत्तर देताना ही महाराष्ट्राची संस्कृती नसून लोकांनीच ही संस्कृती हद्दपार करायला पाहिजे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

Leave a Comment