धक्कादायक … मुंबईत 95 टक्के इमारतींचे फायर ऑडिटच नाही

mumbai
मुंबई: अंधेरीतील लोटस बिझनेस पार्क इमारतील लागलेल्या आगीनंतर मुंबईत उभारलेल्या टोलेजंग इमारती फायर ऑडिट न करताच बांधण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे इमारतींची उंची आणि अग्निशमन दलाकडील शिडींची उंची यात मोठी तफावत असल्याचेही उघडकीस आले आहे . परिणामी बांधकामांना परवानगी देताना नियमांची पायमल्ली होत असल्याचा मुद्दा पुन्हा गाजणार आहे.

काचेच्या इमारतींच्या सुरक्षेसंदर्भातील एक भीषण वास्तव समोरआले आहे . एकदा इमारतीला फायर सेफ्टीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सहा महिन्यांत एकदा प्रत्येक इमारतीचे फायर ऑडिट करणे कायद्याने बंधनकारक असतानाही मुंबईतील 95 टक्के इमारतींमध्ये हे ऑडिट होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.याचबरोबर मुंबईच्या अग्निशमदन दलाकडे केवळ 68 मीटर उंचीची शिडी असलेली वाहने आहेत. पण मुंबईत बहुतांश इमारतींची उंची ही 100 मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे लोटस बिझनेस पार्कमध्ये घडलेल्या प्रसंगामध्ये उंचावर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमदन दलाकडे पुरेशी साधनही नसतात. त्याचा परिणाम म्हणून नितीन इवलेकरांसारख्या जवानांना आपले प्राणही गमवावे लागतात.2009 साली करण्यात आलेल्या कायद्यानुसार प्रत्येक इमारतीचे फायर ऑडिट करणे , आग विझवण्यासाठी लागणारी साधनसामग्री योग्य आहे की नाही हे पाहणे इमारतीच्या मालकाला किंवा सोसायट्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. पण त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे उघडकीस आले आहे.

Leave a Comment