‘त्या’ विमानाचा ब्लॅकबॉक्स बंडखोरांच्या ताब्यात ?

plane
ग्राबोव्ह – पूर्व युक्रेनमध्ये मलेशियाच्या प्रवासी विमानावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये २९५ निरपराध नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागल्याने जगभरातून या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत असताना या विमानाचा ब्लॅकबॉक्स बंडखोरांच्या ताब्यात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या घटनेला जबाबदार असणारे युक्रेनियन बंडखोर तपासात अडथळे आणत आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या तपासकर्त्यांना युक्रेनियन बंडखोरांनी संपूर्ण परिसराची पाहणी करण्यापासून रोखले. विमान कोसळले त्या भागाला बंडखोरांनी घेराव घातला आहे.या तपासामध्ये महत्वपूर्ण पुरावा ठरु शकणारा विमानाचा ब्लॅकबॉक्स बंडखोरांच्या हाती लागल्याची शक्यता आहे. बंडखोर कुठल्याही प्रकारच्या शस्त्रसंधीला तयार नाहीत. त्यामुळे या भागात बंडखोर आणि युक्रेनच्या लष्करामध्ये लढाई सुरुच आहे. विमान पाडले त्या ठिकाणापासून दूरवरपर्यंत अजूनही अनेक मृतदेह विखुरलेले आहेत.

Leave a Comment