अण्णा हजारे यांचे दौरे स्थगित

anna
अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या पाठीच्या आजारामुळे राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरातच असून त्यांचे बाहेरचे दौरे थांबवण्यात आल्याची माहिती अण्णांचे स्वीय सहाय्यक दत्ता आवारी यांनी दिली.

भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन, माहितीचा अधिकार, जनलोकपाल यासारख्या महत्त्वपूर्ण कायद्यांसाठी अण्णांनी वेळोवेळी अहिंसात्मक मार्गाचा अवलंब करताना उपोषणाचा मार्ग अवलंबला. अण्णांचे वाढते वय व त्यात आत्मक्लेष करताना आतापर्यंत केलेल्या उपेाषणांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला तरी अण्णांनी देशव्यापी दौरे काढून ठिकठिकाणी जाहीर सभा घेताना मोठय़ा प्रमाणात जनजागृती केल्याने माहिती अधिकारसारखे क्रांतिकारक कायदे झाल्याने सर्वसामान्य जनतेत अण्णांची प्रतिमा उजळून निघाली. दिल्ली येथे अण्णांनी केलेल्या उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जनहित नजरेसमोर ठेवून अण्णांनी केलेले काम त्यांची त्यागी वृत्ती व जोडीला निष्काम सेवा त्याचबरोबर अनेक मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून अण्णांनी अशा मंत्र्यावर कारवाई करण्यास भाग पाडले. हे करत असताना अण्णांनी कधीही स्वत:च्या प्रकृतीचा विचार केला नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. सध्या पाठीच्या मणक्यांचा त्रास होत असल्याने अण्णांना प्रवास करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment