कांद्याची आयात, आधी निर्यात बंद; दर स्थिर होणार

onion
नवी दिल्ली :वाढत्या दरामुळे सर्वसामन्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्रसरकारने आता उपाययोजना सुरु केल्या आहेत.

त्यानुसार केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी देशातील बाजारात कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी आणि किमतींवर अंकुश लावण्यासाठी व्यापार मंत्रालयाला इतर देशांकडून आयात करण्यापूर्वी देशातील कांदा निर्यातीवर बंदी आणण्याचा सल्ला दिला आहे. पासवान यांनी व्यापारमंत्री निर्मला सीतारामन यांना एका पत्राद्वारे ही शिफारस केली आहे. १ लाख टन कांदा आयात करण्याबाबत अन्न मंत्रालयाकडून शिफारस मागण्यात आली होती. यानंतर पासवान यांनी आपली शिफारस केली आहे. ही शिफारस मंजूर झाली तर कांद्याचा दर स्थिर होण्यास मदत होणार आहे. मागील महिन्यात सरकारने कांद्याच्या निर्यातीवर किमान निर्यात मूल्य लागू केले होते. त्यानंतर कांद्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे; पण काही प्रमाणात अजूनही कांद्याची निर्यात केली जात आहे. म्हणूनच कांदा आयातीस परवानगी देण्यापूर्वी कांदा निर्यात बंद करणे आवश्यक आहे, असे पासवान यांचे म्हणणे आहे. सरकारने मागील महिन्यात कांदा निर्यातीसाठी प्रतिटन ३00 डॉलर किमान निर्यात मूल्य लागू केले होते. केवळ तीन महिन्यांपूर्वीच हे निर्यात मूल्य हटवण्यात आले होते.

Leave a Comment