राणे समर्थकांना सेनेत घेवून खच्चीकरणाचा डाव

fatak
मुंबई – काँग्रेस नेते नारायण राणेंना शिवसेना प्रवेशाची दारे उद्धव ठाकरेंनी आधीच बंद केली आहेत. मात्र राणेंचे समर्थक गळाला लावून राणेंचे राजकीय खच्चीकरण्याचा प्रयत्न शिवसेनेने सुरु केल्याचे राणे यांच्या कट्टर समर्थकांना सेनेत प्रवेश देवून होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
ठाण्यातील काँग्रेस नेते आणि राणेंचे कट्टर समर्थक रविंद्र फाटक आणि त्यांची पत्नी यांनी तसेच काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.रविंद्र फाटक, त्यांच्या पत्नी, दीपक वेतकर, राजा गवारी, कांचन चिंदकर, मनप्रीत कौर, मीनल संख्ये यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपला बालेकिल्ला भरभक्कम करण्याच्या दृष्टीने शिवेसेनेने सुरु केलेल्या प्रयत्नांना यामुळे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

माणूसकी त्यांना दिसेल … दरम्यान, ‘ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ दे, खरी माणूसकी त्यांना थोड्या दिवसातच दिसेल,’ अशी प्रतिक्रिया नारायण राणेंनी रविंद्र फाटक यांच्या शिवसेना प्रवेशानंतर दिली.

Leave a Comment