राणेंना थोपविण्यासाठी बाबा मैदानात

rane
सातारा : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपध्दतीवर नारायण राणेंची नाराजी आहे. त्यामुळे ते मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोमवारी स्वत: नारायण राणेंची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांना राणेंची नाराजी दूर करण्यात यश मिळते का हे पाहणे महत्वाचे आहे.

राणेंनी दोन दिवसाआधीच सोमवारी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सोमवारी राजीनामा देण्याआधी राणेंची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री स्वत: भेट घेणार आहेत. राणेंनी याधीही निलेश राणेंच्या पराभवानंतर राजीनामास्त्र उगारले होते.

आता पुन्हा एकदा राणेंनी राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. आता ह्या राजकीय नाट्यावर सोमवारी पडदा पडणार आहे. दरम्यान नारायण राणे राजीनामा देणार नाहीत असा विश्वास वनमंत्री पतंराव कदम यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment