माजी राष्ट्रपती कलामांना भेटला गुगलबॉय कौटिल्य

kalam
गुगल बॉय म्हणून प्रसिद्धीस आलेला पाच वर्षांचा अत्यंत जिनियस मुलगा कौटिल्य पंडित याने नुकतीच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची भेट घेतली आहे. आपल्या असामान्य ज्ञानामुळे आणि टिव्ही वरील शो मुळे घराघरात पोहोचलेला कौटिल्य कलाम यांना भेटून अतिशय खूश झाल्याचे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि अब्दुल कलाम यांच्या भेटीचे कौटिल्यचे स्वप्न होते. त्यातील एक स्वप्न आता पुरे झाले आहे.

या भेटीत कलाम यांनी कौटिल्यचे कौतुक करतानाच त्याला अनेक प्रश्न विचारले आणि कौटिल्यने त्यांची अतिशय विचारपूर्वक उत्तरे दिली. तुझ्या शेंडीला मी हात लावू का असे कलाम यांनी विचारताच मात्र तो लाजला. कौटिल्यला भूगोल विषयाची खूप आवड आहे व आता त्याला अंतराळ क्षेत्राचीही आवड निर्माण झाली आहे. त्या संबंधाने त्यानेही कलाम यांना अनेक प्रश्न विचारले.

Leave a Comment