मलेशियाच्या विमानावर ज्या भागातून मिसाईल डागले गेले तो भाग रशियाला अनुकुल असलेल्या दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी केले आहे. म्हणजेच या हल्ल्याला त्यांनी अप्रत्यक्षपणे राशिया जबाबदार असल्याचे सुचविले आहे. युक्रेनच्या अशांत भागातून जात असलेले मलेशियन एअरलाईन्सचे विमान जमिनीवरून मिसाईल डागून पाडण्यात आले होते व त्यात २९५ जणांचा मृत्य झाला आहे.
मलेशिया विमान हल्ला- ओबामांनी रशियाला धरले जबाबदार
अमेरिकेच्या यूएन मधील राजदूत समंथा पॉवर यांनीही मलेशियन विमानावर जे मिसाईल डागले गेले ते तज्ञांच्या सहकार्याशिवाय डागणे अशक्य असल्याचे मत व्यक्त करताना या हल्ल्यासाठी रशियातील कोणा तज्ञांची मदत घेतली गेली असली पाहिजे अशी पुस्ती जोडून ओबामांच्या विधानाला एकप्रकारे समर्थन दिले आहे. या घटनेची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणीही अमेरिकेसह अनेक देशांनी केली आहे.
दरम्यान विमान पडले त्याठिकाणी मृतांची ओळख पटविण्यात मदत करण्यासाठी इंटरपोलची डिझास्टर आयडेंटिफिकेशन टीम व मिसिंग पिपल्स युनिटचे पथक ४८ तासात रवाना होत असल्याचेही समजते. या अपघातातील मृतांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एडस संशोधक, ब्रिटीश सॉसर फॅन्स, दक्षिण अफ्रिकेतील सुरक्षा हेलिकॉप्टर पायलट, डच सिनेटर असल्याचे प्रवाशांच्या यादीवरून स्पष्ट झाले आहे.