चंद्रावरील विवरांतून मनुष्यवस्ती शक्य

moon
चंद्रावर जाऊन राहण्याचे स्वप्न माणूस दीर्घकाळापासून पाहतो आहे. हे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची आशा आता निर्माण झाली असून चंद्रावर असलेल्या लक्षावधी विवरांमध्ये मनुष्यवस्ती शक्य असल्याचे नासाचे नवे संशोधन आहे. या विवरांमुळे चंद्रावरील धुळीची वादळे. रेडिएशन, असह्य उष्णता अथवा जीवघेणी थंडी यापासून माणसाला संरक्षण मिळू शकते असे नासातील संशोधकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे ही विवरे अंतराळवीरांसाठीही उत्तम निवासस्थाने बनू शकतील अनुमान वर्तविले जात आहे.

चंद्रावरील हे क्रेटर किंवा विवरे लक्षावधींच्या संख्येने आहेत. त्यांची लांबी रूंदी पाच मीटरपासून ९०० मीटर पर्यंत आहे. सर्वात प्रथम जपानच्या कागुया या यानाने चंद्रावरील तीन विवरांचे फोटो काढले होते. त्यानंतर नासाच्या लूना आर्बिटर यानाने संगणकाच्या सहाय्याने अशा लक्षावधी विवरांचे फोटो टिपले आहेत. अॅरिझोना विद्यापीठातील संशोधक रॉबर्ट वेंगर यांनी ही विवरे माणसांच्या वस्तीला उपयुक्त ठरू शकतील या शक्यतेला दुजोरा दिला आहे. या विवरांतून लाखो वर्षांपूर्वी लावा रस वाहात होता असेही समजते.

Leave a Comment