2327 कोटींच्या एफडीआय प्रस्तावांना केंद्राकडून हिरवा कंदील

fdi
नवी दिल्ली – 2,326.72 कोटी रुपयांच्या गुंतवणूकींच्या 19 एफडीआय प्रस्तावांना केंद्र सरकारने मंजुरी दिली असून यामध्ये `वॉल्ट डिज्नी’ कंपनी आणि `रेकिट बेंकायजर’ यांच्या गुंतवणूक प्रस्तावांचा समावेश आहे.

`एफआयपीबी’च्या 11 जून 2014 रोजी पार पडलेल्या बैठकीत आलेल्या प्रस्तावांचा विचार करुन एकूण 2,326.72 कोटी रुपयांच्या 19 एफडीआय प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. अर्थमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने याबाबतची माहिती दिली आहे.

एफआयपीबीने मात्र, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स), `जॉर्ज इंन्स्टियूट फॉर ग्लोबल हेल्थ’ (हैदराबाद), बीआयईएसएसइ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (बेंगळुर) तसेच तीन अन्य एफडीआय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली नाही. अर्थ मंत्रालयाने सात एफडीआय प्रस्तावांबाबतचा निर्णय टाळला आहे. यामध्ये अलकॉन पॅरेंटेरलस (इंडिया), इंडिया रोटोक्राफ्ट लिमिटेड आणि यूबीएम मेडिका यांच्या प्रस्तावांचा समावेश आहे. केंद्र सरकारने `वॉल्ट डिज्नी’ कंपनी (दक्षिण पूर्व आशिया), सिंगापूरच्या `यूटीव्ही सॉफ्टवेअर कम्युनिकेशन्स’ मध्ये अतिरिक्त गुंतवणूक करण्यावरही निर्णय घेतला आहे.

Leave a Comment