सुधारगृहांपेक्षा मुले गुन्हेगारांकडेच बरी ;आर. आर. पाटील

rr-patil
ठाणे – सुधारगृहांपेक्षा मुले गुन्हेगारांकडेच असलेली बरी वाटतात, असे विधान गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी करताना महिला व बालविकास विभागासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद असते. पण, सुधारगृहांच्या सुधारणेसाठी ती खर्च होत नाही, अशा शब्दात वर्षा गायकवाड मंत्री असलेल्या राज्याच्या महिला व बालविकास विभागाला फटकारले आहे.

ठाणे पोलिसांनी स्थापन केलेल्या ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’चे उदघाटन आर.आर. पाटील यांच्या हस्ते आणि अभिनेता सुनील शेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी आबांनी बालसुधारगृहांची दुर्दशा चव्हाट्यावर आणली. लहान मुलांचे हक्क नाकारले जात आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत असल्याने अशा प्रकारचे युनिट सुरू करण्याची वेळ ओढवली आहे. मात्र, यापुढे अल्पवयीन मुलांना कामावर ठेवले किंवा त्यांच्यावर कोणी अत्याचार केले; तर पोलिसांचा दांडा अशा गुन्हेगारांच्या पाठीत पडला पाहिजे, असे फर्मान आबांनी सोडले.’चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’चे काम ठाण्यात यशस्वी ठरले, तर संपूर्ण राज्यात हा पॅटर्न राबवण्याचे आश्वासनही आबांनी यावेळी दिले.

Leave a Comment