रशियन बंडखोरांनीच विमान पाडले ; युक्रेनचा आरोप

ukrain
कीव : युक्रेनचे राष्ट्रपती पेट्रो पोरोशेन्को यांनी युक्रेनच्या हद्दीत मलेशियन एअरलाईन्सच्या विमानावर झालेला क्षेपणास्त्र हल्ला हा रशियन बंडखोरांनीच केला असल्याचा दावा केला असून या विमानाच्या मागे तीन तासांच्या अंतरावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान होते, अशी माहिती समोर आली आहे.

मलेशियाचे ‘एमएच 17’ हे प्रवाशी विमान काल ऍम्स्टरडॅमवरून कौलालंपूर येथे जात होते. रशियाच्या हवाई हद्दीपासून केवळ 50 किलोमीटर अंतरावर क्षेपणास्त्र हल्ला करून हे विमान पाडण्यात आले. या दुर्घटनेत विमानातील सर्व 295 प्रवाशांचा मृत्यू झाला. आपल्या हद्दीतून युक्रेनचे विमान गेल्यास हल्ला करण्याची धमकी रशियन बंडखोरांनी दिली होती. त्यामुळे हा हल्ला रशियन बंडखोरांनीच केला असल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्रपतींनी केला आहे.

जगभरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या हल्ल्यांचा निषेध केला आहे. तसेच युक्रेनला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल आहे.

Leave a Comment