`मुंद्रा’ पोर्टमध्ये इकॉनॉमिक झोनला केंद्राची मंजुरी

mudra
नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशातील सर्वात मोठी पोर्ट ऑपरेटर `अदानी पोर्ट्स अँड सेझ’ला गुजरातच्या मुंद्रा पोर्टमध्ये विशेष इकॉनॉमिक झोन निर्माण करण्यासाठी मंजुरी दिली आहे. कंपनीने याविषयीची माहिती दिली असून कंपनीचे समभाग 7 टक्क्यांनी शेअरबाजारात वधारून 281.10 रुपयांवर पोहोचले.

जानेवारी 2014 मध्ये गौतम अदानी यांच्या या कंपनीला जोरदार झटका बसला होता. गुजरात उच्च न्यायालयाने मुंद्रा सेझला 21 मध्ये 12 युनिट्स बंद करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने हे आदेश काही गावांच्या जनहित याचिकेवर दिले होते. या याचिकेत या गावांनी सेझमधील बांधकामांमुळे त्यांच्या उपजिविकेवर परिणाम होणार असल्याचे म्हटले होते.

सेझ पुन्हा सुरू झाल्याने जहाज वाहतूक आकर्षित करण्यास मदत मिळणार आहे. हा सेझ जवळजवळ 8,481 हेक्टरमध्ये पसरला आहे. `एमके ग्लोबल’चे प्रवक्ते नितिन अरोरा म्हणाले, की अदानी पोर्ट्ससाठी ही चांगली बातमी आहे. शेअरबाजाराला चिंता होती, की पर्यावरण मंत्रालय 12 युनिट्ससहीत पूर्ण सेझ रद्द करेल. या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण मंत्रालयाला याबाबतचा अंतिम निर्णय घ्यावयास सांगितले होते.

Leave a Comment