भारतात चीन करणार 30 अब्ज डॉलरची गुंतवणूक

invest
सिंगापूर – भारतात चीनकडून प्रत्यक्ष होणारी विदेशी गुंतवणूक 2025 पर्यंत वाढून 30 अब्ज डॉलर एवढी होण्याची शक्यता आहे. याविषयीची माहिती `द सिल्क रोड डिस्कवर्ड’ या पुस्तकात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

या पुस्तकात म्हटले आहे की, भारतात चीनकडून येणारा एफडीआय वाढून 30 अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. भारतात अपेक्षाकृत जास्त प्रमाणात चीनी संकुल स्थापित होण्याची शक्यता आहे. हे पुस्तक सिंगापूरच्या उद्योगपती गिरीजा पांडे, `चायना इंस्टीटय़ूट’ चे अध्यक्ष अनिल के. गुप्ता आणि या संस्थेचे प्रबंध भागीदार हैयान वांग यांनी लिहिले आहे.

या पुस्तकात म्हटले आहे की,वरील निष्कर्ष भारतस्थित कंपनीमध्ये 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त इक्विटी भागीदारीकडे इशारा करते.

Leave a Comment