पुतीन होते हल्लेखोरांचे लक्ष्यस्थानी ?

putin
नवी दिल्ली : एमएच-17 विमानावर झालेल्या मिसाइल हल्ल्यात रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना लक्ष्य केले जाणार होते, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

अद्याप कोणीही विमानावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसल्यामुळे हा हल्ला नेमका कोणी घडवून आणला, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. त्यामुळेच आता पुतीन हेच या हल्ल्यातील खरे लक्ष्य होते, असा तर्कविस्तार होत आहे.

रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एमएच-17 आणि पुतीन यांच्या विमानाचा मार्ग सारखाच होता. विमानावर हल्ला झाला त्याच्या काहीवेळापुर्वीच पुतीन यांचे विमान या मार्गावरून गेले होते. पुतीन यांच्या विमानाची वेळ अचानक बदलण्यात आल्यानेच ते बचावले असल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, पुतीन यांनी मलेशियाच्या विमानावर झालेल्या हल्ल्याला युक्रेनच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ज्या देशाच्या सीमेच्या आत अशी घटना घडली आहे, त्याच देशाने याची जिम्मेदारी घ्यावी. असे पुतीन यांनी म्हणल्याचे वृत्त रिया नोवोस्ती या न्यूज एजन्सीने त्यांच्या हवाल्याने दिले आहे.

Leave a Comment