नेल्सल मंडेला यांना गुगलची डूडलद्वारे श्रद्धांजली

google
मुंबई : आज दक्षिण अफ्रिकेचे गांधीवादी नेते ‘नेल्सन मंडेला’ यांची 96वी जयंती आहे. यानिमित्ताने जगभरातील नेते आणि आम जनताही त्यांचे स्मरण करत असून गुगलनेही एक शानदार डूडल बनवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मदिबा या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंडेला यांना आधुनिक दक्षिण अफ्रिकेचे ‘पितामह’ ही म्हटले जाते. गेल्या वर्षी 6 डिसेंबर रोजी वयाच्या 95व्या वर्षी प्रकृती बिघडल्याने त्यांचे निधन झाले.

मंडेला यांना 1990 मध्ये ‘भारतरत्न’ आणि 1993 साली ‘नोबेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेल्सन मंडेला वर्णभेदाविरोधात लढा देऊन पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती बनले. त्यामुळे त्यांना दक्षिण अफ्रिकेचे ‘महात्मा गांधी’ म्हणूनही संबोधले जाते.

Leave a Comment