घरातील कर्त्याप्रमाणे अनेक भूमिका पार पाडणारा जिबो रोबो

jobo
पर्सनल रोबो ग्रुप तर्फे एमआयटी मिडिया लॅबमध्ये असा खास रोबो तयार करण्यात आला आहे की जो ऑरगनायझर, एज्युकेशनल टूल आणि घरातील वृध्द माणसांना आवश्यकेनुसार मदत करू शकेल. जिबो असे त्याने नामकरण केले गेले आहे. हा रोबो ग्राहकांना ४९९ डॉलरमध्ये मिळू शकणार आहे. मात्र सॉफ्टवेअर विकसकांसाठी त्याची किंमत आहे ५९९ डॉलर्स.

किंमतीतील हा फरक का असावा असा प्रश्न पडला असेल ना? पर्सनल रोबो ग्रुपच्या सिंथिया ब्रसील सांगतात की आम्ही तयार केलेला जिबो एका कुटुंबाची आवश्यक ती सर्व मदत करेलच पण कौटुंबिक संबंध अधिक दृढ करण्यासही हातभार लावणार आहे. या रोबोचे सॉफ्टवेअर कुणीही सॉफटवेअर तज्ञ विकसित करू शकेल आणि आम्हाला असे विकसक हवे आहेत की जे जिबो अधिकाधिक फ्रेंडली आणि उपयुक्त ठरावा यासाठी त्यात कांही सुधारणा करू शकतील. जिबोला अधिक प्रगल्भ करण्यासाठी अशा तज्ञांनी पुढे यावे अशी आमची इच्छा आहे. या विकसकांना हा रोबो विकत घेऊन त्यात सुधारणा करता येणार आहेत. म्हणून त्याची किंमत त्यांच्यासाठी थोडी जास्त आहे.

Leave a Comment