मोदींनी अँजेला मर्केलना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

modi
फ्रंकफर्ट – जर्मनीला भारत आपला सन्मानयीय मित्र मानतो. दोन्ही देशांचे संबंध दृढ व्हावेत अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी आपण भारत भेटीवर यावे. आपल्या ६०व्या वाढदिवसानिमित्त माझ्या शुभेच्छा.तसेच फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने मिळविलेल्या विजयाबद्दल आपले अभिनंदन अशा शब्दात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांना शुभेच्छा दिल्या असल्याचे समजते. ब्राझील येथील दोन दिवसांची ब्रिक्स परिषद संपवून परत येताना मोदी कांही काळ फ्रँकफर्टला हॉटेल स्टेनबर्गर येथे थांबले होते. तेव्हा मोदींनी मर्केल यांच्याशी फोनवरून संपर्क साधून आपल्या भावना कळविल्या.

मोदींनी मर्केल यांना पुढच्या वर्षात द्विपक्षीय चर्चेसाठी भारत भेटीवर येण्याचे आमंत्रण दिले आहे. मर्केल यांनी मोदींच्या आमंत्रणचा स्वीकार केला असून मोदींनाही जर्मनीच्या भेटीसाठी येण्याचे आमंत्रण दिले आहे. ब्राझीलला परिषदेसाठी जातानाही मोदी फ्रॅकफर्ट येथे थांबले होते मात्र त्यावेळी मर्केल फुटबॉलच्या अंतिम सामन्यासाठी ब्राझीलला गेल्या असल्याने या दोन नेत्यांचे बोलणे होऊ शकले नव्हते.

Leave a Comment