मँचेस्टर युनायटेडच्या प्रशिक्षकपदी व्हान गाल

Louis-van-Gaal
मँचेस्टर : फिफा विश्वचषक स्पर्धेत हॉलंडला तिसरे स्थान संपादन करुन देणाऱया लुईस व्हान गाल यांनी गुरुवारी अधिकृतरित्या मँचेस्टर युनायटेड संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. ते नव्या कारकिर्दीचा श्रीगणेशा दि. 23 जुलै रोजी लॉस एंजिल्स गॅलक्झीविरुद्ध ते मँचेस्टर युनायटेडच्या करतील. त्यानंतर मँचेस्टर युनायटेडच्या लढती एएस रोमा व इंटर मिलान संघाविरुद्ध होणार आहेत. जागतिक स्तरावरील सर्वेत्तम मॅनेजर्सपैकी एक असा व्हान गाल यांचा लौकिक असून त्यांनी ऍजेक्स, बार्सिलोना, बायर्न म्युनिच व एझेड ऍल्कमर या क्लब्जना प्रशिक्षणाच्या कालावधीत विविध प्रतिष्ठेची जेतेपदे मिळवून दिली आहेत. रियान गिग्ज हे व्हान गाल यांचे सहायक प्रशिक्षक म्हणून त्यांना सहकार्य करणार आहेत.

Leave a Comment