बफेटकडून गेटस फौंडेशनला २१० कोटी डॉलर्स दान

billgates
वॉरन बफेट या अमेरिकन अब्जाधीशाने या आठवड्यात त्यांच्याच बर्कशेयर हाथवे कंपनीचे २८० कोटी डॉलर्स किमतीचे शेअर पाच चॅरिटेबल कंपन्यांना दान म्हणून दिले आहेत. यात बिल अॅन्ङ मलिंदा गेटस फौंडेशनचाही समावेश असून त्यांना २१० कोटी म्हणजे १६८३४ कोटी रूपये दान म्हणून दिले गेले आहेत.

वॉरन बफेट यांनी त्यांची सर्व संपत्ती दान करून टाकण्याचा संकल्प केला आहे. पाच कंपन्यांना दान दिले गेलेले शेअर्स या त्याच संकल्पाचा एक भाग असल्याचे समजते. या दानात त्यांनी त्यांच्याच कंपनीचे २८० कोटी डॉलर्स किमतीचे बी क्लास शेअर दान दिले आहेत. बिल गेटस फौंडेशनला १.६६ कोटी शेअर्स दिले गेले आहेत.

Leave a Comment