गाजापट्टीत इस्रायलकडून लष्करी कारवाई सुरू

gaza
गाजापट्टी : इस्रायलकडून गुरूवार पासून गाजापट्टीत हमास दहशतवाद्यांची पाळेमुळे कायमची उखडून टाकण्यासाठी जमिनीवरील लष्करी कारवाईला सुरूवात केली असून. तर हमासने इस्रायलला या कारवाईचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

गेल्या दहा दिवसांपासून गाजापट्टीत इस्रायल लष्कर आणि हमास दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यात आतापर्यंत 237 नागरिक ठार झाले आहेत. काल पाच तासांचा संघर्ष विराम स्थानिक नागरिकांना खाद्य पदार्थ व अन्य जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंनी पुन्हा संघर्ष सुरू झाला. इस्रायल लष्कराकडून कारवाई सुरू असलेल्या भागातील नागरिकांना घरे खाली करून जाण्यास सांगितले आहे.

Leave a Comment