इराकमध्ये मुस्लीम कैद्यांचा नरसंहार

terrorist
बगदाद : कैदेत असलेल्या पाचशेहून अधिक शिया मुस्लिमांचा इराकमधील सुन्नी दहशतवाद्यांनी गोळया घालून नरसंहार केला आहे.

इराक गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार, बदुश तुरूंगातून पळालेल्या कैद्याला पकडल्या नंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून हा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. 10 जूनला सुन्नी दहशतवाद्यांनी मोसूल शहरावर ताबा मिळविल्यानंतर बदुश तुरूंगाधिकाऱयांनी तुरूंगाच्या चाव्या दहशतवाद्यांकडे सोपविल्या. त्यांनतर या दहशतवाद्यांनी सर्व कैद्यांना एकत्र करून त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे वेगवेगळे करण्यात आले. या वेळी शिया असलेल्या पाचशेहून अधिक शियांना मैदानात नेण्यात आले. तेथे त्यांना गोळया घालून ठार मारण्यात आले. या नरसंहारातून 17 कैदी कसेबसे वाचले. त्यात 14 जण गंभीर जखमी होते.

Leave a Comment