आता मोबाईल अॅपवरून करा भ्रष्टाचाराच्या तक्रारी

mobile
मुंबई – महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सरकारी आणि निम्न सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी लवकरच मोबाईल अॅप सुरु करण्यात येणार आहे.

राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही घोषणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकीत केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लावण्यात येणारे सापळे यशस्वी होत आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत त्यात जुलैपर्यंत १०७ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. नागरीकांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे आले पाहीजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Leave a Comment