20 जुलैनंतर होणार महायुतीचे जागावाटप : फडणवीस

fadnvis
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या जागावाटपांबाबत 20 जुलैनंतर घटक पक्षांशी चर्चा होणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भाजपच्या प्रदेश कमिटीने कोकण आणि मुंबईतील जिल्हा कोअर कमिटीशी संघटनात्मक चर्चा केली. या चर्चेनंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. 25 वर्षात शिवसेना-भाजप युतीत घट्टबंध निर्माण झाले आहेत. ही युती विचारांची आणि आदर्शवादी अशी भक्कम युती असून भाजपा कोणत्याही परिस्थितीत युती तोडणार नाही. महायुतीतील सहा घटक पक्ष जागावाटपाबाबत योग्य तो निर्णय घेतील. प्रत्येक पक्षाला योग्य जागा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थापनामध्ये सहाय्य असणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

पंकजा मुंडे यांनी राज्यात रहावे की, केंद्रात नेतृत्त्व करावे याबाबत एकत्रित निर्णय घेईल. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढण्याची चर्चा कोणीही करत नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपची पहिली यादी 15 ऑगस्ट दरम्यान जाहीर होईल. जागावाटपांची घोषणा 20 जुलैपर्यंत होणार आहे, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, अतुल भातखळकर आदी मान्यवरही उपस्थित होते.

Leave a Comment