शिर्डीत साईबाबांच्या चरणी साडेचार कोटी रूपयांचा चढावा

saibaba
द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचा कोणताही परिणाम साईभक्तांवर झाला नसल्याचे दिसून आले आहे. शिर्डीत साजर्‍या झालेल्या गुरूपोर्णिमेच्या तीन दिवसांच्या उत्सवात भाविकांनी साईचरणी प्रचंड प्रमाणावर दान दिले असल्याचे मुख्य कोषागार दिलीप जिर्पे यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार शंकराचार्यांनी साईबाबा मुस्लीम होते म्हणून त्यांची पूजा केली जाऊ नये तसेच साईबाबा देव नाहीत अशी विधाने केली होती. मात्र या विधानांचा उलट परिणाम झाला असून भक्तांचा साईबाबांवरचा विश्वास अढळ असल्याचेच प्रत्यक्षात दिसून आले आहे. यंदाच्या उत्सवात १ लाखांहून अधिक भाविकांनी शिर्डीला भेट दिली तसेच दान पेठीत गतवर्षीच्या तुलनेत ३८ लाख रूपये अधिक जमा झाल्याचेही दिसून आले. यंदाच्या वर्षात भाविकांनी दिलेल्या दानात ३.१० कोटी रूपये रोकड, सोने चांदी स्वरूपात आले आहेत. १.४६ कोटी रूपये संस्थानाला ऑनलाईनवरून व कॅश कौंटरवर मिळाले आहेत. विदेशी चलनाचाही त्यात समावेश असून ही रक्कम १० ते १२ लाख रूपये आहे.

मुख्य कोषागार जिर्पे यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्थानच्या नावे विविध राष्ट्रीयीकृत बँकात असलेल्या खात्यात ११९० कोटी रूपये जमा असून संस्थानकडे ३०५ किलो सोने आणि ३६४७ किलो चांदी आहे. याची बाजारातील किमत आहे १०८ कोटी रूपये.

Leave a Comment