राकेश मारिया यांची चौकशी होणार

maira
मुंबई : मुंबई पोलीस दलाचे प्रमुख राकेश मारिया यांना शहीद आयपीएस अधिकारी अशोक कामटे यांच्याबाबतची सूचना थांबविण्यासह त्यांच्या पत्नी विनिता कामटे यांना दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत.

मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारला एका सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग कायद्यान्वये चौकशी समिती स्थापन करण्यास सांगितले होते. कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांना राकेश मारिया यांनी दिशाभूल करणारी माहिती दिली होती की नाही, याचा तपास ही समिती करणार होती. ९ जुलै रोजी रत्नाकर गायकवाड यांनी तीन पानी आदेश जारी केला असून; त्या आदेशात या प्रकरणी दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment