मायक्रोसॉफ्ट करणार सहा हजार कर्मचाऱयांची कपात

microsoft
सियाटल : सहा हजार कर्मचाऱयांची कपात करण्याचा निर्णय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा येणाऱ्या बुधवारी कंपनीकडून करण्यात येणार आहे. हा निर्णय व्यापारी रणनितीमध्ये बदल करण्यासाठी आणि आर्थिक बाबींची पुनर्रचना करण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी एप्रिलमध्ये नोकिया कंपनी मायक्रोसॉफ्टने विकत घेतली होती. 7.2 अरब डॉलरला हा व्यवहार झाला. त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या कामगारांची एकूण संख्या 1 लाख 27 हजारावर पोहचली. यापैकी नोकियामध्ये कार्यरत असलेल्या सहा हजार कर्मचाऱयांची कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनीचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 39 वर्षातली ही सर्वात मोठी कामगार कपात आहे.

Leave a Comment