माजी पोलीस आयुक्तांच्याविरोधात याचिका

gulabrao-pol
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पुण्याचे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मांत्रिकाची मदत घेतल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयात पोळ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका दाखल झाली आहे.

डॉ़ दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

मात्र त्याचवेळी एका मासिकाने पोळ यांनी मारेकऱ्यांचा शोधासाठी मांत्रिकाची मदत घेतल्याचा दावा केला. यामुळे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याची तक्रार गृहविभागाकडे केली़ त्याची दखल न घेतल्याने पाटील यांनी आता न्यायालयाचे दार ठोठावले.

Leave a Comment