बॉक्सर मेवेडर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू

mayweather
फोर्ब्स मासिकाने श्रीमंत अॅथलेटच्या जाहीर केलेल्या यादीत अमेरिकेचा बॉक्सर फ्लाईड मेवेडर हा जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला असून त्याची वार्षिक कमाई १०५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ६३१ कोटी रूपये आहे. या यादीत भारताचा महेंद्रसिग धोनी हा एकमेव खेळाडू असून त्याचे स्थान २२ वे आहे. धोनीची वार्षिक कमाई १८० कोटी रूपये आहे.

फोर्ब्जने या यादीसाठी २७ देशांतील १० खेळांतील खेळाडूंचा विचार केला आहे. टेनिस मध्ये रॉजर फेडरर सर्वाधिक श्रीमंत खेळाडू आहे. या यादीनुसार पहिल्या दहा क्रमांकात मेवेडर- ६३१ कोटी, फुटबॉलपटू रोनाल्डो ४८१ कोटी, बास्केटबॉल पटू लेब्रायन जेम्स ४३४ कोटी, फुटबॉलपटू मेसी ३८९ कोटी, बास्केटबॉल पटू कोबे ब्रायंट ३६९ कोटी, गोल्फ पटू टायगर वुडस ३६८ कोटी, रॉजर फेडरर ३३८ कोटी, गोल्फ पटू मिकेल्सन ३२० कोटी, टेनिसपटू राफेल नदाल २६७ कोटी व फुटबॉलपटू रेयान २६३ कोटी यांचा समावेश आहे.

Leave a Comment