फ्रान्सच्या कॉर्नेटला पराभवाचा धक्का

Alize-Cornet
बॅस्टेड – फ्रान्सच्या अलैझ कॉर्नेटचे आव्हान स्वीडनमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत समाप्त झाले. कॉर्नेटचा इस्टोनिआच्या कॉन्टेव्हेटने 7-6(7-3), 6-3 असा पराभव केला.

पुढील फेरीतील 18 वर्षीय कॉन्टेव्हेटचा सामना स्लोव्हाकियाच्या सिपेलोव्हाशी होणार आहेत. जर्मनीच्या सिगेमंडने कझाकच्या शेडोव्हाचा 7-5, 6-3, हॉलंडच्या हॉगेनकेंपने स्लोव्हाकियाच्या स्किमेडीलोव्हाचा 6-3, 6-1, जर्मनीच्या अनिका बेकने पोलंडच्या पीटेरचा 6-3, 4-6, 6-3 असा पराभव करत पुढील फेरी गाठली.

Leave a Comment