नारायण राणेंची मंत्रिपदाला सोडचिट्ठी!

rane
मुंबई : येत्या सोमवारी पुन्हा एकदा राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे मंत्रिपद सोडणार असल्याची घोषणा स्वत: दिली आहे.

मंत्रिपदाचा राजीनामा देणार असलो तरी, काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे राणेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राणे पक्षातच राहणार आहेत.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार करण्याचे सगळे प्रयत्न करुनही अपयश आल्याने नारायण राणे चांगलेच नाराज झाले आहेत. पक्षश्रेष्ठींना वारंवार सांगूणही पक्ष नेतृत्वात बदल होत नसल्याने राणे पुन्हा एकदा राजीनाम्याचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेसच्या लोकसभा पराभवासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जबाबदार असल्याचे राणेंचे म्हणणे आहे. पराभवासि खापर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडून, मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचा राणेंचा डाव होता. पण पृथ्वीराज चव्हाण यांचे पक्षातील वजन आणि त्यांचे दिल्लीतील संबंध वापरुन त्यांनी आपली खूर्ची शाबूत ठेवली. त्यामुळे नारायण राणे नाराज झाले.

यापूर्वी लोकसभा निवडणुकीत चिरंजीव निलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर राणेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण पक्षाकडून समजूत काढल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. त्यामुळे यावेळीही राणेंचा राजीनामा म्हणजे केवळ दबावतंत्र असेल की त्यांना खरंच मंत्रिपदाचा त्याग करायचा हे लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Comment