अव्वल जलतरणपटू इमॉन सुलिव्हान निवृत्त

emon
मेलबॉर्न – आंतरराष्ट्रीय जलतरण क्षेत्रातून ऑस्ट्रेलियाचा अव्वल जलतरणपटू इमॉन सुलिव्हानने आपली निवृत्ती जाहीर केली. सुलिव्हान 100 मी. फ्रीस्टाईल प्रकारात माजी विश्वविजेता आहे.

50 मी. फ्रिस्टाईलमध्ये 28 वर्षीय सुलिव्हानने विश्वविक्रम केला आहे. गेल्या महिन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याने ग्लॅस्गो राष्ट्रकुल स्पर्धेतून यापूर्वीच माघार घेतली होती. मेलबॉर्नमध्ये 2007 साली झालेल्या विश्व रिलेचे त्याने जेतेपद मिळविले होते. अलीकडच्या काही महिन्यात सुलिव्हानला वारंवार दुखापतीने चांगलेच दमविले होते. इमॉनला डॉक्टरांनी 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी न होण्याचा सल्ला दिला होता. वयाच्या 18 व्या वर्षी सुलिव्हानने ऍथेन्स ऑलिम्पिकमध्ये आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

Leave a Comment