हॅम्बुर्ग खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत ग्रेनोलर्स पराभूत

Marcel-Granollers
हॅम्बुर्ग – 8 व्या मानांकित मार्सेल ग्रेनोलर्सचे येथे सुरू असलेल्या हॅम्बुर्ग खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. अडीच तासांच्या कालावधीत ऑस्ट्रियाच्या थिमने ग्रेनोलर्सचा 2-6, 6-3, 7-5 असा पराभव केला. अर्जेंटिनाच्या मेयरने जर्मनीच्या गोजोविकचा 6-3, 6-2, अर्जेंटिनाच्या मोनॅकोने स्पेनच्या रिबाचा 6-3, 6-1, स्लोव्हाकियाच्या क्लिझेनने हॉलंडच्या स्लेझलिंगचा 6-4, 3-6, 6-0, कोलंबियाच्या गिराल्डोने फ्रान्सच्या पेरीचा 7-6 (8-6), 6-2 असा पराभव करत पुढील फेरी गाठली.

Leave a Comment