सौदी अरेबियात बसेसची नवी आवृत्ती सादर करणार अशोक लेलँड

leyland
दुबई – सौदी अरेबियामध्ये या महिन्यात २०१५ ही बसेसची नवी आवृत्ती भारतातील प्रसिद्ध वाहन उत्पादन कंपनी असलेल्या अशोक लेलंडतर्फे सादर करण्यात येणार आहे.

अशोक लेलँडच्या बसगाड्यांना सौदी अरेबियामधील कंपन्यांच्या कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी सर्वाधिक पसंती दिली जाते. सौदी अरबरेबियातील आघाडीची कंपनी असलेल्या रियाध मेट्रो, सौदी बिनलादेन आणि इतर सर्व प्रमुख सौदी अरॅमको कंत्राददारांकडून कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी कंपनीच्या बसगाड्या वापरल्या जातात. या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि अधिक आरामदायी अशा बसेसची नवीन आवृत्ती बाजारात आणणार आहे, असे कंपनीचे सौदी अरेबियातील मुख्य वितरक असलेल्या वेस्टर्न ऑटोचे महाप्रबंधक विश्‍वकुमार यांनी सांगितले.

Leave a Comment