सर्वात सोपी प्रक्रिया : चटण्या

chutanya
खरे तर शेती मालावर केली जाणारी सर्वात सोपी प्रक्रिया म्हणजे चटणी. प्रक्रिया उद्योगात लक्ष घाला असे म्हटले की अनेक शेतकरी अनेक बहाणे सांगत असतात. मशिनरी कोठे असते ? भांडवल कोठून आणावे आणि मार्केटिंग कोठे आहे असे कितीतरी बहाणे. पण चटण्या कुटायला काय लागते ? भांडवल लागते का मशीनरी लागते ? भुईमुगाच्या शेंगा, जवस, कार्‍हळ, लसूण, खोबरे, अशा कशाकशाच्या चटण्या खाल्ल्या जातात याचा जरा शोध घ्या. शहरांतल्या अनेक दुकानांतून आता अशा अनेक प्रकारच्या चटण्या विक्रीला यायला लागल्या आहेत. गेल्या काही वर्षात तर शहरातल्या बायकांनी घरात चटण्या कुटणे बंद करून टाकले आहे. त्यांना आयत्या चटण्या खाण्याची सवय झाली आहे. येत्या काही वर्षात चटणी घरात कुटायची असते हे लोक विसरून जातील. या प्रवृत्तीनेच आपले मार्केट तयार झाले आहे. शहरातल्या महिला ज्या वस्तू तयार करणार नाहीत त्या वस्तू म्हणजे आपली व्यवसायाची संधी आहे असे मानायला काही हरकत नाही. गंमतीचा भाग म्हणजे या चटण्या तयार करण्याच्या अनेक पद्धती शहरातल्या लोकांना माहीत नाहीत. त्या खेड्यात तयार झाल्या तर त्यांची गावरान चव शहरवासीयांंना नक्कीच आवडेल.

आज महाराष्ट्रभर सोलापूरची शेंगाची चटणी ङ्गार लोकप्रिय झाली आहे. तशी चटणी तयार करून सोलापूरचे अनेक लोक पुणे, नाशिक, कोल्हापूर या शहरांत त्यांची विक्री करीत असतात. त्यावर अनेकांनी पैसेही चांगले कमावले आहेत. या व्यवसायात शेतकर्‍यांनी स्वत: उतरले पाहिजे आणि खेड्या खेड्यांत चटण्यांचे छोटे छोटे कारखाने काढले पाहिजेत. याबाबत गावात बेकार ङ्गिरणार्‍या सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. शहरांतली दुकाने या चटण्यांची विक्री करू शकतात. शिवाय धाबे आणि हॉटेल यांच्याकडेही ठोक गिर्‍हाईक म्हणून पाहता येईल. आज मुंबईतले काही कारखानदार शेंगाची चटणी किलोला १०० ते १२५ रुपये घेऊन विकतात. कधी नव्हे ते चटण्या कुटून विकणे हा भरपूर पैसा देणारा उद्योग झाला आहे. शेतकर्‍यांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे. शहरांत चटण्यांशिवाय मेतकूट, पुड चटणी, अशा काही दुर्मीळ खाद्य वस्तू अजिबात मिळत नाहीत. मिळाल्या तरीही त्या ङ्गार महाग असतात. त्यांतही आपण लक्ष घालू शकतो. तळणी मिरची हा एक पदार्थ असाच दुर्मिळ झालेला आहे. तोही आपण तयार करून विकू शकतो.

काही वेळा कागदी लिंबे बाजारात एकदम येतात आणि स्वस्तात विकली जातात. ती एवढी स्वस्त असतात की शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले जाते. अशा वेळी गावातच अशी लिंबे विकत घेऊन त्यांचा रस काढून तो गरम करून त्यात साखर विरघळवून जतन करून ठेवला तर तो उन्हाळ्यात सरबत तयार करणारांना विकता येतो. त्या दिवसात लिंबू महाग झालेले असते आणि असा जतन केलेला लिंबाचा रसच त्यांना किङ्गायतशीर आणि सोयीचा पडत असतो. याही पदार्थाला काही तंत्रज्ञान लागत नाही की त्याला काही मशिनरी लागत नाही. आपण नेहमी करीत असलेल्याच या प्रक्रिया आहेत. त्या करून त्यांची विक्री करण्याचे कौशल्य प्राप्त केले की अंधारातून मार्ग दिसणार आहे.अशाच रितीने डाळिंबाच्या रसाचेही सरबत तयार करता येत असते. प्रक्रिया उद्योग प्रचंड संधी आहे. त्यामुळे त्याची अधिक माहिती स्वत: शेतकर्‍यांनीच मिळवली पाहिजे. त्याशिवाय प्रक्रिया उद्योगावर बाजारात अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. डॉ. दिलीप कुलकर्णी ५०३, यमुनाश्री अपार्टमेंट, नवशा मारुती शेजारी, पु.ल. देशपांडे गार्डनसमोर, सिंहगड रोड, पुणे. (मोबाईल ९४२२६५३४३४.) यांच्याशी संपर्क साधायला हरकत नाही.

ठाणे येथील अनघा गांधी या अन्न प्रक्रिया उद्योगातल्या अनेक प्रक्रियांचे प्रशिक्षण देतात. त्यामध्ये औषधी वनस्पतीवरील प्रक्रिया, भाज्यांवरील प्रक्रिया, ङ्गळांवरील प्रक्रिया यांचा समावेश आहे. प्रक्रिया उद्योगासोबतच त्यांना लागणारे परवाने, पॅकिंग, मार्केटिंग याविषयी सुद्धा त्यांच्याकडे सविस्तर माहिती दिली जाते. त्यांचा पत्ता- २०२, कृपा चेंबर्स, मल्हार टॉकीज शेजारी, नौपाडा टेलिङ्गोन एक्सचेंज समोर, ठाणे (प.) (ङ्गोन नं. ९३२५०७२००६)असा आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात प्रक्रिया उद्योगासंबंधी सखोल अभ्यास करणार्‍यांमध्ये पुण्याचे श्री. पद्माकर देशपांडे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांनी शेती माल प्रक्रिया उद्योगावर अनेक दैनिकांतून लिखाण केलेले आहे. त्यांचा ङ्गोन नं. ९३२५००६२९१ असा आहे. विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन अशा संस्थांतर्ङ्गे अन्न प्रक्रिया उद्योगाचे कमी कालावधीचे अभ्यासक्रम चालवले जातात. अशा संस्थांंशी संपर्क साधून त्या अभ्यासक्रमांची माहिती आपल्याला मिळविता येईल. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क साधला की ही माहिती मिळू शकते. तसेच या संबंधात सौ. ललिता बोरा, ३८/१, मयुरेश्वर आश्रय, प्लॉट नं. ४८४ अ, लक्ष्मी नारायण थिएटरच्या मागे, पर्वती दर्शन, पुणे-४११ ००९. ङ्गोन – ०२० – २४४४७५४२ मोबाईल ९४२२५००२६९ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Comment