सर्फ, डोव्ह च्या किंमती वाढल्या

hl
देशातील कंझ्युमर प्रॉडक्ट क्षेत्रातील अग्रणी हिदुस्थान लिव्हर कंपनीने त्यांच्या सर्व उत्पादनांच्या किमतीत १ ते ८ टक्के वाढ केली आहे. कंपनीने नव्याने जाहीर केलेल्या दरांनुसार अॅक्टीव्ह व्हिल डिटर्जट पावडरचे दर किलोला १ रूपयांने वाढले आहेत. सर्फ एक्सेल मॅजिकचे दर ६ रूपयांनी वाढविले गेले असून एक किलोसाठी ग्राहकांना आता २३० रूपये मोजावे लागणार आहेत.

अन्य उत्पादनांत लाईफबॉयच्या १२५ ग्रॅमच्या वडीसाठी आता २४ रूपये मोजावे लागतील तर डोव्हच्या ७५ ग्रॅमची वडीसाठी ४६ रूपये ग्राहकाला द्यावे लागणार आहेत. पूर्वी ही किंमत ४४ रूपये होती. सनसिल्क शांपूची किंमत ही १८० मिलीलिटरच्या बाटलीसाठी १२० वरून १२५ रूपये केली गेली आहे.

Leave a Comment