नवी दिल्ली – विजय माल्या यांची कंपनी ‘किंगफिशर एअरलाइन्स देशातील टॉप नॉन-परफॉर्मिग असेट (एनपीए) ठरली असून किंगफिशरने सरकारी बॅंकांचे सुमारे 4022 कोटींचे रुपये थकविले आहेत आणि आता ही थकबाकी चुकती करण्यात किंगफिशरने असमर्थता दर्शवली आहे. यामुळे सरकारी बॅंकांची मोठी गोची होऊन बसली आहे.
विजय माल्यांच्या किंगफिशर एअरलाइनकडे 4022 कोटींची थकबाकी
विनसम डायमंड अँड ज्वेलरी ही कंपनी थकबाकीदारांमध्ये दुसर्या क्रमांकावर आहे. या कंपनीकडे बॅंकांचे सुमारे 3200 कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर तिसर्या क्रमांकावर इंजीनियरिंग फर्म इलेक्ट्रोथर्म इंडिया आहे. या कंपनीने 2600 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.
सरकारी बॅंकांनी टॉप 50 डिफॉल्टर्सची यादी अर्थमंत्रालयाकडे सुपूर्द केली आहे. थकबाकीदारांकडे एकूण 53000 कोटी रुपये थकले आहेत. (डिसेंबर 2013 पर्यंत) बॅंकांनी अर्थ मंत्रालयाकडे सुपुर्द केलेल्या अहवालानुसार, 50 पैकी 19 डिफॉल्टर्सकडे 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे.