मेक्सिकोत शीतपेयांच्या जाहिरातीवर बंदी

colddrinks
मेक्सिको – देशातील स्थूलपणाची समस्या नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे मेक्सिकोत टीव्ही, सिनेमागृहात शीतपेयांच्या, स्नॅक्स व अन्य जादा कॅलरीच्या पदार्थांच्या जाहिराती दाखविण्यावर बंदी घातली गेली आहे. सरकारने ही बंदी त्वरीत लागू होत असल्याची घोषणा केली आहे.

दूरदर्शन वाहिन्यांसाठी रविवार सोडून अन्य दिवशी दुपारी अडीच ते रात्री साडेनऊ पर्यंत या जाहिराती दाखविता येणार नाहीत तर रविवारी सकाळी सात ते सायंकाळी साडेसात पर्यंत या जाहिराती दाखविता येणार नाहीत. सिनेमा थिएटरमध्येही या जाहिरातींवर बंदी घातली गेली आहे.

सरकारकडून या बंदीसंबंधी खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार मेक्सिकोत ७० टक्के ज्येष्ठ नागरिक व ३० टक्के मुले स्थूल आहेत. जगात शीतपेयांचा सर्वाधिक खप मेक्सिकोत असून येथे दरवर्षी शीतपेये पिण्याचे प्रमाण दर माणशी सरासरी १६३ लिटर इतके आहे. त्याच बरोबर येथे तळलेल्या पदार्थांचे सेवनही भरपूर केले जाते. ऑरगनायझेशन फॉर इकॉनॉमिक को आपरेटीव्ह अॅन्ड डेव्हलपमेंट मध्ये सामील असलेल्या ३४ देशांपैकी मेक्सिको येथे मधुमेहींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही समजते.

Leave a Comment