‘ मित्र पक्ष नारायण राणे यांना घेणार नाहीत’

udhav
मुंबई : मित्र पक्षांना त्रास देणाऱ्यांना पक्षात घ्यायचे नाही, हा युतीतील सामंजस्य करार असल्यामुळे नारायण राणे यांना भाजपमध्ये घेणार नाहीत असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यामुळे नारायण राणे यांना भाजप म्हणजेच युतीत प्रवेश मिळणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

भाजपमध्ये नारायण राणे हे जातील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती, नारायण राणे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यापासून ते भाजपमध्ये जातील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. नारायण राणे भाजपमध्ये जातील, या शक्यतेवर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

नारायण राणे भाजपमध्ये जाणार यावर मात्र, नारायण राणे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave a Comment