मुंबई – आज दुपारी दीडच्या सुमारास मुंबईच्या वरळी नाका परिसरात महानगर गॅसची भूमिगत पाईप लाईन मधून अचानक गॅस गळती सुरू झाली होती. यानंतर महानगर गॅसचे अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ही गॅसगळती थांबवण्याच्या केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना यश आले आहे.
महानगर गॅसच्या पाईपलाईनला गळती
या गॅसगळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. या परिसरात ड्रेनेजचे काम सुरू असल्याचे समजते आहे. ही गॅस गळती मोठी नसल्याचे अग्निशामन दलाच्या सुत्रांनी म्हटले आहे.