मराठवाड्यातून निवडणूक लढवणार राज ठाकरे ?

raj
जालना: मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक मराठवाड्यातून लढवावी, असा सल्ला दिला आहे. ते जालन्यात बोलत होते.

विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे राज ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिलेच ठाकरे ठरणार आहेत.

राज ठाकरेंच्या घोषणेनंतर ते कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

राज हे दादरमधून निवडणूक लढवतील असा अनेकांचा अंदाज आहे. तसंच त्यांनी डोंबिवलीतून निवडणूक लढवावी अशी तिथल्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. तर नाशिकमधून निवडणूक लढवण्याबाबतही चाचपणी सुरू आहे.

हे सर्व सुरु असतानाच, तिकडे जालन्यात बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंनी मराठवाड्यातून निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघातून मनसेच्या तिकीटवर निवडून आलेले, हर्षवर्धन जाधव यांची मनसेतून हकालपट्टी कऱण्यात आली आहे. असं असताना मराठवाड्यात मनसेची म्हणावी तितकी ताकद दिसत नाही. त्यामुळे बाळा नांदगावकर कोणत्या विश्वासाने राज ठाकरेंना हा सल्ला देत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Comment