भारतीय संघाच्या खेळाडूंमध्ये कपात

glassgow
नवी दिल्ली – भारतीय ऍथलेटिक संघात ग्लॅस्गो येथे होणाऱया 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी कपात करण्यात आली आहे. भारतीय ऍथलेटिक संघटनेने यापूर्वी 41 जणांचा संघ जाहीर केला होता पण आता या संघात 32 खेळाडू राहतील, अशी घोषणा केली आहे.

भारतीय संघात दुती चंदला या क्रीडा स्पर्धेसाठी वगळण्यात आले. त्याचप्रमाणे रणजीत माहेश्वरी आणि पुरुषांच्या रिले संघातील 6 धावपटूंना त्यांच्या असमाधानकारक कामगिरीमुळे या स्पर्धेसाठी वगळण्यात आले. नवोदित महिला धावपटू दुती चंदला शेवटच्या क्षणी लिंग चाचणी करण्याचा आदेश दिल्याने तिची चाचणी बेंगळूरमध्ये करण्यात आली. मात्र या चाचणीचा अहवाल मिळाला नसल्याने तिला या स्पर्धेसाठी वगळण्यात आले असे सी. के. वाल्सन यांनी सांगितले. 23 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान ग्लॅस्गो येथे ही राष्ट्रकुल स्पर्धा भरविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 224 जणांच्या भारतीय पथकाला मंजुरी दिली आहे. तथापि, आता ऍथलेटिक चमूमध्ये कपात करण्यात आल्याने या स्पर्धेत भारताचे 215 जणांचे पथक सहभागी होईल.

भारतीय ऍथलेटिक संघ- राजीव अरोकीया, के. मोहम्मद, सचिन रॉबी, ललित माथुर, जीतू बेबी, जिबेन सेबेस्टियन, सिद्धार्थ थिंगलेया, अरपिंदर सिंग, ओमप्रकाश करना, विकासगौडा, रविंद्रसिंग खेरा, देवेंद्रसिंग, विपीन कासेना, कमलप्रित सिंग, सी. नारायणसिंग, शारदा नारायण, एच. एम. ज्योती, सरबानी नंदा, आशा रॉय, शांतीनी वल्लिकद, मेरेलिन जोसेफ, एम. आर. पुअम्मा, टिंटू लुका, देबाश्री मुजुमदार, रतनदीप कौर, ए. थॉमस, अश्विनी अकुंजी, सहाना कुमारी, मयुखा जॉनी, सीमा पुनिया, कृष्णा पुनिया, अनुराणी.

Leave a Comment