इंग्लंड : अँडरसन-जाडेजा धक्काबुक्की प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली असून इंग्लंड संघ व्यवस्थापनाने रविंद्र जाडेजा विरोधात हातघाईवर आल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे अँडरसन पाठोपाठ आता जाडेजा विरोधातही कारवाई होणार आहे.
जाडेजावरही कारवाई होणार
नॉटिंगहम कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा फलंदाज रविंद्र जाडेजा यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. याप्रकरणी भारतीय संघ व्यवस्थापनाने अँडरसन विरोधात धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची तक्रार केली. त्यांनतर आता इंग्लंड संघ व्यवस्थापनानेही जाडेजा विरोधात हातघाईवर आल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे आरोप सिध्द झाल्यावर या दोन्ही खेळाडूंवर कारवाई होणार आहे.