गुवाहाटीसाठी खेळणार स्पेनचा कॅप्डेव्हिला

Joan-Capdevila
गुवाहाटी – स्पेनचा माजी डिफेंडर जोआन कॅप्डेव्हिलाची प्रमुख खेळाडू म्हणून भारतात होणाऱया इंडियन सुपर लीगमधील नॉर्थ ईस्ट युनायटेड क्लब या गुवाहाटी प्रँचायजीने निवड केली आहे. कॅप्डेव्हिला हा विश्वचषक व युरोपियन चॅम्पियनशिप मिळविणाऱया स्पेन संघातील माजी खेळाडू आहे.

या प्रँचायजीचा एक मालक व बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम असून या क्लबकडून आपण उत्सुक झालो असल्याचे कॅप्डेव्हिलाने सांगितले. प्रमुख खेळाडूची घोषणा करणारा गुवाहाटी प्रँचायजी हा दुसरा संघ आहे. याआधी ऍटलेटिको डी कोलकाताने स्पेनच्याच लुईस गार्सियाची प्रमुख खेळाडू व अँटोनिओ लोपेझ हबास यांची प्रमुख मॅनेजर म्हणून निवड केल्याचे जाहीर केले आहे.

विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूला घेतल्याने जॉन अब्राहमही उत्साहित झाला आहे. `कॅप्डेव्हिलाचे या खेळातील योगदान व त्याची उपस्थिती आपल्या संघातील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणादायक ठरेल. त्याचा समृद्ध अनुभव भविष्यातील बलवान संघ बनविण्यास उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास वाटतो. तो लवकरच संघात दाखल होईल,’ असे अब्राहमने सांगितले. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या पाठिंब्याने आयएसएल ही स्पर्धा आयएमजी-रिलायन्स व स्टार इंडिया यांनी पुरस्कृत केली असून 19 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ती विविध ठिकाणी होणार आहे.

Leave a Comment