ऍथलेटिक्स स्पर्धेत असाफा पॉवेल तिसरा

asfa
लुसेरेनी – जमैकाचा अव्वल धावपटू असाफा पॉवेलवर उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने बंदी घातली होती, बंदीचा कालावधी संपल्यानंतर पॉवेलने पहिल्यादाच भाग घेतला होता. ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत या अव्वल धावपटूने येथे झालेल्या तिसरे स्थान मिळविले.

जमैकाच्या जुलियन फोर्टने 10.23 सेकंदासह 100 मी. धावण्याच्या शर्यतीत पहिले स्थान तर अँटोनी ऍडॅम्सने 10.29 सेकंदासह दुसरे तसेच पॉवेलने 10.30 सेकंदासह तिसरे स्थान पटकाविले. पॉवेल आणि शेरोनी सिम्सन यांच्यावर 18 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. या निर्णयाविरुद्ध पॉवेलने क्रीडा लवादाकडे दाद मागितल्याने त्याच्या बंदीचा कालावधी सहा महिन्याने कमी करण्यात आला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये पॉवेलने लॉसेनी डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता.

Leave a Comment