शस्त्रसंधी करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

benjamin
तेलअविव- इस्रायलने इजिप्तने देऊ केलेली शस्त्रसंधीची योजना स्वीकारली आहे. मात्र हमासने ही योजना नाकारल्यास गाझापट्टीत लष्करी कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांनी दिला.

तेलअविव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नेत्यनाहू म्हणाले की, हमासने शस्त्रसंधीचा प्रस्ताव नाकारल्यास गाझा पट्टीत लष्करी कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू करेल. तसेच इस्रायलवर रॉकेट हल्ले न थांबवल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. इस्रायली नागरिकांची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

गाझा पट्टीतून लष्कर हटवावे अशी इस्रायलची इच्छा आहे. आम्ही शस्त्रसंधीच्या इजिप्तच्या प्रस्तावाला आम्ही पाठिंबा देत आहोत. क्षेपणास्त्र, रॉकेट आणि खंदक यातून गाझापट्टीची सुटका व्हावी अशी आमची इच्छा आहे, असे नेत्यनाहू म्हणाले.

दरम्यान, हमासने इजिप्तचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव नाकारला असून मंगळवारी सकाळी इस्त्रायलच्या अँशकेलॉन शहरावर तीन रॉकेट डागली. मात्र ती मोकळ्या भागात कोसळल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Leave a Comment