लंकेविरुद्धच्या कसोटीत आमलाने घडविला इतिहास

amla
गॅले – आजपासून सुरू झालेल्या श्रीलंका विरुद्धच्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेचा हशिम आमलाने नवा इतिहास घडविला आहे. द. आफ्रिकेचे अव्वल कसोटीवीर ग्रीम स्मिथ आणि कॅलीस यानी निवृत्ती पत्करल्यानंतर आमलाकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. कसोटीमध्ये कर्णधारपद भूषविणारा आमला हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू ठरणार आहे.

गेल्या महिन्यात स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. त्यानंतर क्रिकेट द. आफ्रिकेने आमलाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली. गेल्या दहा वर्षात स्मिथने १०९ सामन्यांत द. आफ्रिकेचे नेतृत्व केले असून हा एक विक्रमच आहे. आजपासून येथे द. आफ्रिका आणि लंका यांच्यात शेवटच्या कसोटीला प्रारंभ झाला असूनअसून आमलाच्या कर्णधारपदाची खरी कसोटी ठरणार आहे.

Leave a Comment