मास्को मेट्रोला भीषण अपघात- २० ठार

moscow
मास्को – मास्को मेट्रोचे तीन डबे भुयारी मार्गात रूळावरून घसरल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान २० प्रवासी ठार झाले असून १६० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतात मेट्रो ड्रायव्हरचाही समावेश आहे. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे मेट्रो सेवा पूर्ण पणे विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत झालेल्या मेट्रो ट्रेन अपघातातील हा सर्वात मोठा अपघात असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार अचानक पॉवर वाढल्याने मेट्रोचा वेग वाढला आणि त्यामुळे डबे अनियंत्रित झाले. चालकाने त्यामुळे अचानक ब्रेक लावला. परिणामी रूळावरून डबे घसरले आणि आतील प्रवासी जोरात एकमेकांवर फेकले गेले. त्यातच वीज गेल्याने गोंधळात भर पडली. डबे धुराने भरल्याने अनेक प्रवासी गुदमरले. सकाळच्या वेळात मेट्रोत नेहमीच गर्दी असते तशीच या मेट्रोतही गर्दी होती. अपघाताचे वृत्त कळताच जखमींना हवाई मार्गाने रूग्णालयात हलविण्यात आले. जखमींची संख्या १६० वर असून त्यातील निम्मे प्रवासी गंभीर जखमी आहेत असे समजते.

Leave a Comment